सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुहास डी. डोके यांना “सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शन विथ मेकॅनिकल स्टिरिंग” या नावाच्या डिझाईन पेटंटला मान्यता मिळाली आहे. हे पेटंट रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनाची दखल असून संस्थेच्या बौद्धिक संपदा निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भर घालणारे आहे.
तसेच प्रा. जयेश व्ही. मापारा यांनी राष्ट्रीय तांत्रिक शिक्षक प्रशिक्षण व संशोधन संस्था (NITTTR) आयोजित राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. हा कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) आधारित परिणामाधिष्ठित शिक्षण (Outcome-Based Education – OBE), अभ्यासक्रम रचना, अध्यापन-अध्ययन पद्धती, मूल्यमापन प्रणाली आणि तांत्रिक शिक्षणातील गुणवत्तावृद्धी या विषयांवर आधारित होताया दोन्ही यशाबद्दल रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. के. कुलकर्णी यांनी दोन्ही प्राध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, अशा यशामुळे विभागातील संशोधन संस्कृती अधिक समृद्ध होत असून विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रेरणा मिळते.संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी देखील डॉ. सुहास डी. डोके आणि प्रा. जयेश व्ही. मापारा यांचे अभिनंदन करताना सांगितले की, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे व्यवस्थापन आणि प्रशासन हे नेहमीच प्राध्यापकांना संशोधन, पेटंट, नवोपक्रम, उद्योगाभिमुख उपक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धीसाठी सातत्याने प्रोत्साहन व आवश्यक सहकार्य देत आले आहे. प्राध्यापकांच्या ज्ञानवृद्धीबरोबरच त्यांचे तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध असून त्यासाठी आवश्यक सुविधा आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून दिले जाते.ही दोन्ही यशस्वी कामगिरी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या संशोधनाभिमुख दृष्टीकोनाची, नवोपक्रमाला दिलेल्या प्रोत्साहनाची आणि प्राध्यापकांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या वचनबद्धतेची साक्ष देणारी आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, विभागप्रमुखसर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि संपूर्ण घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट परिवारातर्फे डॉ. सुहास डी. डोके आणि प्रा. जयेश व्ही. मापारा यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या भावी संशोधन, शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Post a Comment